life is unpredictable !!!
life is unpredictable ...
सगळे बोलतात जीवन हे क्षणभंगुर आहे.पण त्या क्षणभंगुर जीवनात कुठले क्षण आपले आणि कुठले परके हे ओळखणे खूप कठीण आहे. कारण जीवनच मुळात खूप unpredictable आहे.
जीवनात सुखा मागे दुःखे येणारच पण त्यातही आपल्याला सुखाचा हव्यास जास्ती असतो. सुखाच्या क्षणांना आपण सारखं गोंजारत बसतो आणि दुःखाला कवटाळून रडत बसतो.मला माहितेय काही गोष्टींचा गुंता सोडवणे एवढं सोप्प नसत मुळात, पण जीवनात येणाऱ्या संकटाना पाठमोर केलं तर ती परत वळून येतात. मग काय करायचं ?कसा या संकटांचा सामना करायचा ?
खुप कमी लोकांमध्ये सत्य स्वीकारण्याची ताकद असते आणि हीच ताकद त्यांची सर्वात मोठी पॉवर असते.
तर काही लोकांना हार पत्करणे खूप अवघड जात.मग अश्या वेळी अश्या काही घटना घडल्या तर;ज्यांचा आपण सामनाच करू शकत नाही असं वाटायला लागत मीच का? दरवेळेस माझ्याच वाट्याला का ? मी काय चूक केली कि सारखं चुकीचं माझ्या सोबत घडत राहत.
तेंव्हा लक्षात घ्या हाच तुमच्या लाइफ चा सर्वात मोठा टर्निंग पॉईंट असतो नवल वाटतंय ना ? वाटू द्या कारण मी पहिलेच सांगितलं आहे life is unpredictable . रोजच एक सारखं आयुष्य जगण्यात काय मजा आहे लाईफ जर चॅलेंजिंग झाली तर थ्रिलर आहे . म्हणून स्वतःला दोष देऊ नका कारण तिकडे तुम्ही चुकीचे नसता तर ती लोक चुकीची असतात जी प्रॉब्लेम क्रिएट करण्यास कारणीभूत असतात. त्यामुळे जीवनात लोक निवडताना पण अशीच निवडा जी तुमच्या ओठान्वर हळुवार स्मिथ हास्य देऊन जातील नाकी तुमचा ऍबिलिटी चा फायदा घेतील.
आयुष्यात नेहमी एक गोष्ट कटाक्षाने पाळा जगण्यात रुबाब आसू द्या आणि जिकडे आपला फक्त फायदा उचलला जातोय तिकडे परत कधीच जाऊ नका. कारण आपल्या समोर जेंव्हा सत्य येत काल पर्यंत आपल्या सर्वात जवळची असणारी गोष्ट एका क्षणात आपण ती गोष्ट पहिल्यांदा पाहतोय किंवा आपण कधी या गोष्टीला पाहिलंय का असा भास व्हायला लागतो ना त्या क्षणी आपण सगळ्यात जास्ती खोलवर हरलेलो असतो.आणि तिकडे जर आपण हरलो ना तर आयुष्याची लढाई कशी जिंकणार .
म्हणून जेंव्हा जीवनात हरल्या सारखं वाटलं ना परत उठा जगाकडे बघा स्वतःकडे बघा जीवन क्षणभंगूर जरी आसल तरी खूप सुंदर आहे .जीवनात चुकीचा रस्ता निवडला म्हणजे आयुष्य संपलं असं नाही आपण स्वतःला चांगले ओळखत असलो तर रोजच नवे मुखवटे घालणाऱ्या विदूषकाचा लोभ कशाला. जस जीवनात अनप्रेडिक्टबल गोष्टी घडतंच असतात मग वाट बघा परत परत. चांगली गोष्ट घडणार नाही का?
काही क्षणांना असं वाटायला लागत कि आपण त्याच्या हातातील भावला आहोत पण अश्या वेळी पत्यांमध्ये जसा हुकुमी इक्का असतो ना तस समोरच्याचा डाव पण पॅक अप करायचा आणि दाखवून द्यायचं कि आपण किती स्वाभिमानी आहोत. मित्रानो जो नेहमीच आपल्या ethics वर चालतो ना त्याचा विजय कदाचित थोडा उशिरा होतो पण असा होतो ना कि सगळं जग बघतच राहत. तेंव्हा मात्र बघायचं कोण आपल्या डोळ्यात डोळे घालून बघू शकत ते. जीवन परीक्षा रुपी महायुद्ध आहे चांगले वाईट होणारच पण या प्रसंगी साथ लागते आपल्या माणसांची ,आपल्या जिवलग मित्रांची ,नातेवाईकांची आपण ज्यांच्यावर मनापासून प्रेम करतो अश्या माणसाची.
जीवनात किती पण चढ उतार आले ना तरी यातील जी लोक तुमचा हाथ वादळात पण सोडणार नाहीत अश्या लोकांना ओळखा त्यांचा हात घट्ट पकडून ठेवा त्यांच्या कठीण प्रसंगी स्वतः सोबत राहा मग बघा हे जग आणखीन सुंदर दिसेल.कारण तेंव्हा सुंदर मनाची लोक तुमच्या सोबत असतील .
life will unpredictable कितीही झाली ना तरी मग परत उठून लढण्याचं बळ मिळेल.
"उडत्या पाखरांना परतीची तमा नसावी,नजरे समोर रोज एक नवी दिशा असावी ,घरट्याचा काय कधी हि बांधता येईल ,पण क्षीतिज्या पलीकडे भरारी मारण्याची जिद्द असावी "
By,
Padmaja S.Rajguru
Wow,खूप छान लिहितेस
ReplyDeleteI really like this blog😊
thank u so much for appreciation ... your comment boosting me write more ..
ReplyDelete